वे. ज्यो. वास्तुतज्ञ- श्री. रविंद्र भगवान पाठक
वे. श्री. रविंद्र भगवान पाठक यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडी (कासार) या गांवी झाला.
संस्कृत मध्ये ‘खर’ या शब्दाचा अर्थ ‘गाढव’ असा होतो तर ‘वंडी’ हा शब्द ‘वंदी’ या शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे.
श्री क्षेत्र पैठण येथील श्रेष्ठ संत श्री एकनाथ महाराज ”ज्योतिर्लिंग श्री काशी विश्वेश्वर ते ज्योतिर्लिंग श्री रामेश्वर” दरम्यान केले जात असलेल्या कावड यात्रेत असताना, खरवंडी गावाच्या उत्तरेला असलेल्या ”हरिहरेश्वर” या पवित्र स्थानाजवळ दुपारच्या वेळी विश्रांती घेत होते. तिथं त्यांनी एक गर्दभ(गाढव) तहानेने व्याकुळ होऊन तडफडत असलेले पाहिले. त्यावेळी त्या व्याकुळ गर्दभास कावडीने घेऊन चाललेले पाणी पाजून त्याची भागवली. या घटनेनंतर हे गाव ‘खरवंदी’ म्हणून परिचित झाले, त्याचाच अपभ्रंश होऊन ‘खरवंडी’ नाव प्रचलित झालेले असून ‘खरवंडी कासार’ या नावाने गाव ओळखले जाते. संत एकनाथ महाराजांचे गुरू ”श्री जनार्दन स्वामी” यांची समाधी देखील गावातच आहे. गावाच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत ”धौम्य ऋषींचे समाधीस्थान” म्हणून प्राचीन ओळख असलेल्या ”धौम्य” गडावर 20 व्या शतकातील संतश्रेष्ठ ”श्री भगवान बाबां”चे समाधी मंदिर आणि गुरुकुलही आहे. आज मितीला या गडाला ‘भगवानगड’ म्हणून ओळखले जाते. श्री भगवान बाबांच्या अपार तप -पुण्याईने हे पवित्र तीर्थक्षेत्र प्रसिद्धीस आलेले आहे.
गादी परंपरेने संतश्रेष्ठ श्री भीमसिंह महाराज यांनी या गडावर लोकोद्धाराचे कार्य करत आपले जीवन वाहून घेतले होते. त्यांच्या पश्चात न्यायाचार्य महंत श्री नामदेव शास्त्रीजी येथील कार्यभार सांभाळत आहेत.
अशा या पवित्र भूमीत पौराणिक परंपरा चालविणाऱ्या जोशी कुटुंबातील ”वे. श्री नारायणराव जोशी” यांचे सुपुत्र ”श्री त्र्यंबकराव” त्यांचे सुपुत्र ”श्री भगवानराव” यांचे दोन पुत्र ”श्री राजेंद्र” व ”श्री रवींद्र जोशी उर्फ पाठक” (आजोबा श्री त्र्यंबकराव जोशी हे काशीला गेले होते तेथे त्यांना ‘पाठक’ ही पदवी बहाल करण्यात आली होती. तेव्हापासून जोशी ऐवजी पाठक आडनांव लागू झाले. वडिलांचे शाळेतील आडनाव आज देखील जोशी हेच आहे. ) हे मौखीक परंपरेने वैदिक अध्ययन करून उपजीविकेसाठी 80 च्या दशकात मुंबईला आले. मुंबईत आल्यानंतर दोन्ही भावंडांनी वेगवेगळ्या मंदिरात पुजारी म्हणून सेवा केली. ज्येष्ठ बंधू श्री राजेंद्र पाठक आजही विरार पश्चिम येथील साईधाम येथे पुजारी म्हणून कार्यरत आहेत व श्री रवींद्र पाठक यांनी सन १९९० ते २००० दरम्यान वर्तकनगर, ठाणे येथे श्री साईबाबा मंदिरात पुजारी म्हणून सेवा केली व त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली.
देव- संत , भारतीय संस्कृती , वेद विज्ञान , संत चरित्र , आदि अध्यात्मिक विषयाचे सहज ज्ञान व्हावे, या उद्देशाने सन २००० साली ”साई सत्संग रत्न” नावाने मासिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली.
साधारण २००२ साली प पु श्री अनिरुद्ध बापू यांच्या वैचारिक बैठकीचा प्रभाव जाणवला आणि त्यांच्याशी जोडले गेले. पुढे कालांतराने साई सत्संग रत्न मासिकातून प्रकाशित झालेल्या दत्तयागाविषयीचे वृत्त वाचून प पु सूचित दादांनी चर्चा करून बापूंच्या घरच्या दत्तयागास निमंत्रण दिले. व अल्पावधीतच प. पु. बापूंनी त्यांचे घराण्याचे ”कुलाचार्य” बहुमान देऊन सन्मानित केले.
गेली ३१ वर्षे ठाणे शहरातील नामवंत, प्रतिष्ठित लोकांचा सहवास वाढत गेला आणि तो वाढत आहे.
मा. आमदार श्री प्रतापजी सरनाईक यांच्या माध्यमातून ”संस्कृती युवा प्रतिष्ठान” आयोजित शारदीय नवरात्रोत्सवाचे प्रधानाचार्य म्हणून गेली २५ वर्षे जबाबदारी आहे,
श्री अशोकजी वैती साहेब यांनी साई आनंद ट्रस्ट द्वारे स्थापन केलेल्या साईबाबा मंदिरातील प्रतिवर्षी होणाऱ्या उत्सवाची यज्ञाची धुरा गेल्या कित्येक वर्षे सांभाळत आहेत.
मा नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब आयोजित पूर्व येथील ”अंबे माँ” वासंतिक नवरात्राची संपूर्ण अध्यात्मिक धुरा व ”सहस्रचंडी यागा”चे प्रधानाचार्य म्हणून जबाबदारी मिळत आलेली आहे.
त्या शिवाय वर्तकनगर नवरात्रोत्सव मंडळ, सार्वजनिक श्री माघी गणेशोत्सव लोकमान्य नगर , साई द्वारकामाई मंडळ , नितीन कंपनी साईबाबा मंदिर, ठाणे शिर्डी वारकरी मंडळ-जोंधळी बाग , सन्मान युवा प्रतिष्ठान वर्तकनगर , नटे प्रतिष्ठान – शिवाई नगर यासारख्या अनेक मंडळाशी निगडित उत्सवात मानाने निमंत्रित करून मोठ्या भक्तिभावाने विधियुक्त कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहयोगी बनवले जात आहे.
श्री रवींद्र पाठक यांनी वैदिक अध्ययनाबरोबरच पारंपरिक पद्धतीने ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचा सर्वांगीण अभ्यास करून असंख्य लोकांना अनमोल सल्ला देऊन समस्या दूर करण्याचा प्रयास केलेला आहे.
दरम्यानच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रासह देश – विदेशात शेकडो यज्ञ, शंभरावर मूर्ती प्राणप्रतिष्ठा, जन्म शांती , महामृत्युंजय जप अनुष्ठान, मंदिराचे वर्धापनदिन, पालखी सोहळ्याची सेवा-पूजा, पारायणं यासारखे कार्यक्रम स्वतःच्या आचार्यत्वात सफल पार पाडलेले आहेत. आजही ही मालिका अविरत सुरू असून अनेक संत, महंत, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यापासून सर्व सामान्य लोकांच्या इच्छेनुसार विविध धार्मिक कार्यात कार्यरत आहेत.
”अध्यात्म” आणि ”ज्योतिष” हे एकाच नाण्याचे दोन अंग आहेत. याच भावनेने पारंपरिक पद्धतीने ज्योतिष शास्त्रानुसार सल्ला मसलत करीत आहेत. विवाह, वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या , नोकरी-व्यवसाय, परदेश गमन योग, आरोग्य, कर्ज विषयक महत्वपूर्ण विषयाचं विशेष विश्लेषण करून असंख्य प्रश्नार्थीचे समर्पक उत्तर देऊन त्यांना सहज स्वभावाने मदत करण्याचा प्रयत्न केला आहे व पुढेही चालू राहील.
बदलत्या सामाजिक स्थितीचा विचार करिता अनेक श्रद्धावानांना पूजन – अर्चन -यज्ञ – याग – अनुष्ठान – पाठ वाचन – विविध ग्रंथांचे पारायण – जन्मशांती – योग् शांती – कालसर्प शांती , वास्तुशांती आदी विविध शांती करण्याची इच्छा असून देखील ते विधी विधान प्रत्यक्ष करण्यास या बदलत्या वातावरणात अडचणी निर्माण होत आहेत.
या सर्व बाबींचा विचार करून प्रत्यक्ष एकत्र येऊन पूजन अथवा कोणतेही धार्मिक कार्य करण्यास अडचणी येतील अथवा इच्छा असून वेळेचा अभाव असेल अशावेळी आचार्यद्वारा आपले नाव-गोत्र उच्चारण करून ते विधी विधान करण्याचे जबाबदारी आमच्यावर सोपवून ते कार्य पूर्णत्वास जाण्यास आमच्याकडून मदत मिळेल हा विश्वास वाटतो.
यासाठी हे एक माध्यम म्हणून ऑनलाईन सेवा सुरुवात केलेली आहे. आपण सर्वानी याचा जरूर लाभ घ्यावा.
*ज्याप्रमाणे एखाद्या तीर्थ क्षेत्रावर जाऊन आपण आपले नाव – गोत्र उच्चारण करून तिथे अभिषेक, महापूजा अथवा अर्चनादी विधी करवून घेतो. ते तेथील पुजारी अथवा पुरोहित करून आपणास पोष्टाच्या सहाय्याने प्रसाद पाठवतात, त्या धर्तीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अथवा मोबाईल कॉलिंगच्या माध्यमातून ही सेवा पुरविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
यासाठी संपर्काच्या वेळेत संपर्क करावा अथवा मेल करावा.